Hollywood च भवितव्य धोक्यात ?#hollywood writer strike, अनेक TV शो आणि सिनेमाच्ं चित्रीकरण बंद पडलं आहे. काय नेमकं कारण? सविस्तर माहिती
मे चा सुरुवातीच आठवडा Hollywood साठी अडचणी घेऊन आलाय, अनेक मोठे टीवी शो आणि मोठे सिनेमांचे चित्रीकरण थांबवण्यात आलेले आहे. नेमकं काय कारण आहे हे आपण सविस्तर पाहूयात.
अमेरिकेमध्ये New york येथे स्थित Writer Wuild of America(East) आणि Las Angeles येथे असलेल्या Writer Guild of America (West) या दोन संस्था Hollywood मधील लेखकांच्या हक्कासाठी कार्यरत आहेत, hollywood मधील लेखकांचे प्रश्न सोडविण्यासाठी या दोन्ही संस्था प्रयत्न करत असतात. सध्या लेखकांच्या हक्कासाठी या संस्था पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत सर्व लेखकांसह संप पुकारला आहे. यामध्ये 11500 पेक्षा अधिक सिनेमा व टीवी शो चे लेखक सहभागी झाले आहेत. यामध्ये काम जास्त आहे पण कामाच्या मानाने मोबदला खुप कमी भेटतो, त्यासाठी स्थिर व योग्य अशी वेतन रचना असावी तसेच त्यांच्या कामाला योग्य तो न्याय मिळवा ह्या त्याच्या प्रमुख मागण्या आहेत.
हॉलिवूड मधील टीवी शो आणि सिनेमा प्रोडक्शन कंपन्यांची प्रतिनिधीत्व करणारी Alliance of motion pictures and television producers संस्थेचे म्हणणे असे आहे की " आम्ही लेखकांच्या मोबदल्याबद्दल एक चांगला प्रस्ताव पाठवला आहे परंतू WGA बाकी मागण्यामुळे तो प्रस्ताव स्वीकारत नाही त्यामूळे आम्ही काही करु शकत नाही. ही संस्था Netflix, Amazon, Disney Apple, Fox आणि इतर 350 हून अधिक प्रोडक्शन कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते.
WGA ने अलीकडे सर्व हॉलीवूड कलाकारांना संपाला पाठिंबा द्या म्हणून आवाहन केलेले आहे, काही प्रमुख कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. त्यापैकी एक Jennifer Coolidge यांनी त्यांच्या भाषणात असे म्हटले आहे की "मी माझ्या लेखक बंधूभगिनीच्या हक्काच लढ्यात सामिल आहे". अभिनेता Pedro Pascal यांनी " लेखक हे त्यांच्या योग्य मोबदल्यासाठी ही लढाई लढत आहे, आम्ही त्याच्या सोबत आहोत" असे म्हणत संपाला पाठिंबा दिला आहे.
5 नोव्हेंबर 2007 रोजी असाच एक संप झाला होता, तो संप 12 फेब्रुवारी 2008 पर्यंत चालला. एवढ्या काळात हॉलीवूड ला तब्बल 2 बिलियन डॉलर्स चा फटका बसला होता. त्यामानाने सध्याच्या काळात संप लवकर मिटला नाही तर खुप मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment