हॉरर मूवी आवडतात ! तर ह्या 5 मूवी नक्की बघा. टॉप 5 हॉरर मूवी इन वर्ल्ड top 5 horror movie
Hollywood मध्ये आतापर्यंत खुप हॉरर मूवी बनल्यात त्यापैकी काही खुपच भयानक अश्या मूवी खाली दिल्या आहेत.
1 Exorcist
दिग्दर्शक William Friedkin यांनी बनविलेला Exorcist हा चित्रपट आजपर्यंत बनलेल्या भयावह चित्रपटात प्रथम क्रमांक पटकावतो. हा सिनेमा इतका भयावह होता की काही ठिकाणी त्याला ban करण्यात आलं होत. चित्रपट सुरु असताना काहीना उलट्या तर काहीना हार्ट atack देखील आला होता.
सिनेमाची कथा ही एका 12 वर्षीय रेगन नावाच्या मुलीची आहे. रेगन तिच्या आईसोबत राहत असते. एक दिवस तिच्या आईला समजते की आपल्या मुलीला भूताने पछाडलं आहे. त्या भूताने आईच्या मैत्रिणीचा खून केलेला असतो, तसेच तो रेगन च्या आईवर ही प्राणघातक हल्ला करतो त्यावेळीस तिची आई तिच्या मुलीला वाचवण्याची चर्चमध्ये जाते फादरकडे विनंती करते. फादर तिचा जीव कसा वाचवतात पुढे काय होतो हे तुम्हाला चित्रपट पाहूनच कळेल.
2 the conjuring
हॉरर चित्रपटाचा विषय निघाल्यावर the conjuring ला विसरुं कसं चाललं. 19 जुलै 2013 ला प्रदर्शित झालेला James Wan दिग्दर्शित the Conjuring हा एक प्रसिद्ध पॉपुलर भयपट आहे.
भयपटाची कथा पेरॉन परिवाराभोवती फिरते. जे आपल्या फॉर्महाउसवर राहायला आले आहेत. त्यांना 5 मुली आहेत आणि त्यांच्याकडे एक कुत्रा पण आहे. थोड्याच दिवसात त्याच्यासोबत विचित्र घटना घडू लागतात. विचित्र स्वप्नं पडू लागतात त्यामूळे पेरॉन परिवार विचित्र घटना तपासणी करणारे एड आणि वारेन यांना बोलवतात. वारेन यांना समजत की येथे वाईट शक्तींचा वास आहे आणि ती शक्ती पेरॉन परिवार जिथे जाईल तिथे पोहचते.
3 the shining
1980 मध्ये प्रदर्शित झालेली द शायनींग मूवी सगळ्यात IMDB रेटिंग असलेली हॉरर मूवी म्हणून ओळखली जाते. 43 वर्ष ह्या मूवीची भिती अजुन कायम आहे.
कथा जैक आणि त्याच्या परिवाराची आहे. जैक आणि त्याचा परिवार एका थंडीच्या रात्रीत एका हॉटेलमध्ये निवास करतात. बाहेर कडाक्याची तर हॉटेल एकदम सुमसाम आणि भकास, भिती वाटावी अश्या या हॉटेलमध्ये एका पाठोपाठ एक अश्या विचित्र घटना घडतात. जैक चा मूलगा वेड्यासारखं वागत्ं असतो त्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसू लागतात. त्यातून हे परिवार त्या गोष्टीला कसं सामोरे जाते ही या भयपटाची कथा.
4 alien
Alien मूवी एक sci-fi हॉरर मूवी आहे. ही कथा एका स्पेसशिप आणि त्यातील लोकांची कथा आहे. एका स्पेसशिप मध्ये 7 जण जात असतात त्यावेळी त्यांना एका विशिष्ट ग्रहावरुन संदेश आल्यामुळे ते त्या ग्रहावर जातात. तिथे त्यांना मनुष्य वस्ती भेटत नाही पण एक परजीवी त्याच्यातला एकाला चिकटून स्पेसशिप मध्ये येतो. तो परजीवी एकाएकाची शिकार करु लागतो. त्यातून ते बाकीचे वाचतात की नाही ही या भयपटची कथा.
5 the ring
2002 साली प्रदर्शित झालेला The Ring हा भयपट भयावह तर आहेच पण त्यासोबत एक रहस्यमय पण आहे ते रहस्य सोडवताना ज्या गोष्टी सामोरे येतात त्या गोष्टी खुप भयावह आहेत.
राहेल केलर नावाचा एक पत्रकार एक कथा शोधत असते तेव्हा तिला एका रहस्यमयी टेपबद्दल समजते. त्या टेपमध्ये एक रिकॉर्डिंग आहे आणि जो तो ऐकतो तो सात दिवसात मरतो. केलर रहस्याचा शोध लावण्यासाठी ती रिकॉर्डिंग ऐकते आणि एका भयावह रहस्यचा शोध घेत जाते पुढे काय होते ते मूवी बघुनच समजेल
Comments
Post a Comment