Chatrapati movie review..अजुन एक साउथ चित्रपटाचा Bollywood remake, #chatrapati movie review 2023, छत्रपती मूवी रिव्यू... hit or flop?

    
एस. एस. राजमौली दिग्दर्शकाच नाव ऐकताच बाहुबली, RRR, मगधीरा, मक्खी सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट आठवतात. त्यांच्याच एका चित्रपटाचा हिंदी रिमेक येतो. चित्रपटाचा रिमेक व्ही. व्ही. विनायक दिग्दर्शित करणार आहेत व चित्रपटात बेल्लमकोंडा श्रीनिवास मुख्य भूमिकेत दिसणार आहेत तसेच नुसरत बरुचा, शरद केळकर, भाग्यश्री हे कलाकर महत्वपुर्ण भूमिकेत दिसतील. राजामौली सरांनी प्रभासला घेऊन केलेला छत्रपती ही सिनेमा सगळ्यानाच आठवत असेलच. त्यातला aggressive प्रभास सगळ्यांनाच आवडला होता. कथा ही अशी होती की एक सर्वसाधारण असलेला तरुण त्याच्या जीवनात झालेल्या घडामोडीमुळे सत्य व न्यायासाठी शस्त्र उचलतो. तो अन्यायविरुध्द बंड करुन लोकांना न्याय मिळवून देत असतो. मदत करत असतो. तसेच त्याची एक प्रेम कहाणी पण आहे, आणि तो आपल्या आई आणि भावाला शोधत आहे. अशी कथा असलेला छत्रपतीचा रिमेक bollywood मध्ये 12 मे ला रिलिझ झाला. राजमौली यांच्या चित्रपटाचा रिमेक म्हटल्यावर सगळ्यांचा नजरा त्याच्यावर टिकून राहिल्या इतर रिमेकसारखं यानेही निराशाच केली. व्ही. व्ही. विनायक यांनी छत्रपती चित्रपटाच्या रिमेकचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी प्रभासने केलेल्या शिवाजी या पात्रासाठी बेल्लमकोंडा श्रीनिवास याची निवड केली. श्रीनिवास याचा हा पहिला बॉलिवूड सिनेमा आहे. जो पुर्ण भारतामध्ये विविध भाषेत एकाच वेळी प्रदर्शित होइल. नुसरत बरुचा, भाग्यश्री, शरद केळकर, फ्रेडी दारुवाला यासारखे अनुभवी व आपल्या चांगल्या कामासाठी  प्रसिद्ध असलेले कलाकार यामध्ये महत्वाची भुमिका साकारताना दिसून येतात. या चित्रपटाची निर्मिती Pen इंडिया लिमिटेड ही production कंपनी करत आहे. चित्रपटाची कथा 1997-98 मधील आहे. चित्रपटाची कथा ही गुजरातमधील अलंग या परिसरात घडते. चित्रपट हा फैमिली ड्रामा असला तरी चित्रपटामध्ये भरपुर मारधाडीचे(action) चे सीन आहेत. त्यामूळे चित्रपट जास्त बोरिंग वाटत नाही. 
शुभनम गिल spiderman भूमिकेत
      चित्रपटाची सुरुवात ही 1985 मध्ये पाकिस्तान व भारताच्या सीमेवरील एका गावात सुरु होते, शिवाजी नावाचा मूलगा आपल्या सावत्र आई पार्वती व अशोक नावाच्या भावासोबत राहत असतो. शिवाजीची आई जरी सावत्र असुन देखिल शिवाजीवर सख्या मुलापेक्षा जास्त प्रेम करते , हे तिच्या मुलाला अशोकला पटत नाही, तो शिवाचा तिरस्कार करत राहतो. एका रात्री गावात दंगल झाल्यामुळे शिवा व त्याची आई दुरावते. शिवा भारतामध्ये गुजरात येथे पोहचतो. व तिथे refugee कम्पमध्ये राहतो. शिवाचा सावत्र भाऊ अशोक आईला सांगतो की शिवा घरात जळुन मेला, परंतु शिवाला त्याच्या शेजारी परिवारातील व्यक्ती वाचवते व त्यांच्याबरोबर गुजरातला घेऊन जाते. कालांतराने अशोक व त्याची आई पार्वती दोघेही भारतात (गुजरात) येतात . शिवाची आई पार्वती शिवाला मृत समजून दरवर्षी त्याचे श्राद्ध घालत असते. शिवा त्याच्या मित्रासोबत गुजरातमध्ये राहत असतो. भैरु सोलंकी नावाचा गुंडांच्या हाताखाली वस्तितील बरेचसे लोक काम करतात.शिवाही त्याच्या वस्तीत काम करतो. भैरुचे सहकारी गुंड शिवा राहतो त्या वस्तीत गुंडागर्दी करतात. तेथील लोकांना त्रास देतात. त्यावेळीस शिवा वस्तीच्या रक्षणासाठी त्याच्याशी दोन हात करतो व वस्तीचा रक्षक बनतो व भैरुबरोबर दुष्मनी करतो. शिवाच्या आईच्या शिकवणीनुसार जो ईतरांसाठी लढतो तो छत्रपती म्हणून त्याला वस्तीचा छत्रपती असे लोक म्हणू लागतात. शिवा आपल्या आई आणि भावाला प्रत्येक ठिकाणी शोधत असतो, आईच्या शोधात असताना त्याला सपना ( नुसरत बरुचा) भेटते, सपना शिवाला त्याची आई शोधायला मदत करते. त्यामूळे भेटिगाठी वाढतात व ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. तिकडे भैरु आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी धडपडत असतो. त्याच वेळी शिवाचा भाऊ अशोक बसमध्ये शिवाच्या मित्राच्या बहिणीच छेड काढतो त्यामूळे शिवा त्याला पकडून त्याचे पुर्ण टक्कल करतो, शिवाने आपल्या सावत्र भावाला ओळखलेले नसते परंतू अशोकला माहित पडते की हाच आपला सावत्र भाऊ आहे आणि तो आईला शोधतोय, अशोक ठरवतो की आपण ह्याची आणि आईची भेट होवू द्यायची नाही म्हणून तो शिवाचा दुश्मन भैरुसोबत हात मिळवून शिवाला मारण्याचा प्रयत्न करतो. अशोकला आपली आई फक्त आपलीच असावी वाटते कारण शिवा भेटला तर आपल्या आईचे आपल्यावरचे प्रेम कमी होइल म्हणून त्यांची भेट होवू नये ह्यासाठी तो प्रयत्न करत असतो परंतू शेवटी शिवा आणि त्याची सावत्र आई पार्वती ह्यांची भेट होते. शिवा आपला सावत्र भाऊ अशोक याची समजुत काढुन त्याला माफ करतो. 
        कमजोर कथा आणि कमजोर स्क्रीनप्ले ह्यामुळे चित्रपट थोडा बोरिंग वाटू शकतो. बेल्लमकोंडा श्रीनिवास याने साकारलेला शिवाचा लूक परफ़ेक्ट जमलाय पण  कमजोर स्क्रीनप्लेमुळे काही ठिकाणी श्रीनिवास याचा अभिनय कमजोर वाटतो. श्रीनिवास याने शिवाच्या भूमिकेसाठी खुप मेहनत केल्याचे दिसुन येते. शिवाच्या भूमिकेसाठी त्याने आपली तब्बेत वाढवली, शरीर पिळदार केले. ऐक्शन सीनसाठी सुद्धा खुप मेहनत केल्याचे दिसून येते. त्याचबरोबर नुसरत बरुचा हिनेदेखील आपल्या सपनाच्या भूमिकेत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. लेखकांना तिचे पात्र अजुन महत्वपुर्ण बनवता आलं असतं. शरद केळकर थोडा वेळ दिसतात पण त्याच्या भूमिकेत ते शोभून दिसतात, शरद केळकर थोडा वेळ दिसतात पण पुर्ण चित्रपटात आपले अस्तित्व किती महत्वाचे आहे हे दाखवून देतात. करण सिंह छाबडा याने दृष्ट सावत्र भाऊ साकारला आहे. जो अतिशय उत्कृष्टपणे साकारलाय. त्यांचा दृष्टपणा अभिनयातून दिसून येतो. फ्रेडी दारुवाला भैरुच्या भुमिकेत दिसून येतो. शिवाची आई बनलेली भाग्यश्रीचा कमबैक असलेली ही दुसरा चित्रपट गळ्या महिन्यात त्या सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान मध्ये छोट्या भूमिकेत दिसून आली होती. भाग्यश्रीने शिवाच्या आईच्या भूमिकेत जीव ओतून काम केले आहे हे चित्रपट पाहिल्यावर दिसून येते. 
दिग्दर्शनाच्या बाबतीत नवं अस काही करण्यात आलेलं नाही त्यावरुन स्पष्ट होत की दिग्दर्शनाच्या बाबतीत दिग्दर्शकाने जास्त मेहनत घेतलेली नाही, राजमौलीच्या चित्रपटातील सीन जसे आहेत तसेच ठेवलेत, फक्त प्रदेशानुसार जागा बदलली आहे. चित्रपटाची पुर्ण गुजरातमध्ये घडते परंतू गुजराती भाषेचा उपयोग जवळपास झालाच नाही. चित्रपटातील गाणी आणि संगीत ऐकायला चांगले आहे परंतू गाण्यातील डान्स योग्यरित्या डायरेक्ट केलेला नाही. डान्स स्टेपमध्ये कमजोरपणा दिसून येतो. चित्रपटातील action सीनवर भरपुर मेहनत घेतली आहे त्यामूळे चित्रपटातील action सीन प्रेक्षकांना शेवटपर्यंत पकडून ठेवतात. ऐक्शन सीनच चित्रपटातील जमेची बाजू आहे. एक ऐक्शन चित्रपट पाहन्यासारखा आहे. चित्रपटातील ऐक्शन सीन थोडेसुद्धा निराश करत नाहीत.
         चित्रपटाची कथा व स्क्रीनप्ले कमजोर असला तरी कलाकारांचा अभिनय उत्तम आहे. तसेच ऐक्शन चित्रपटाची आवड असणारे प्रेक्षक हा चित्रपट खुप एन्जॉय करतील यात शंका नाही. ऐक्शन सोबतच एक फैमिली ड्रामाही या चित्रपटात आहे त्यामूळे कलाकारांचा अभिनय, ऐक्शन सीन व फैमिली ड्रामासाठी  छत्रपती एकदा बघायला जायला पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

Hollywood च भवितव्य धोक्यात ?#hollywood writer strike, अनेक TV शो आणि सिनेमाच्ं चित्रीकरण बंद पडलं आहे. काय नेमकं कारण? सविस्तर माहिती

Adipurush trailer 24 तासात 42 मिलियन view, आदिपुरुष ट्रेलर चा विक्रम, आदिपुरुषचा comeback? टीझरवर भरपुर टिका, तर ट्रेलरवर एवढं प्रेम? खरचं मूवीच्या VFX मध्ये सुधारणा? adipursh trailer

हे आहेत नविन guardians of the galaxy, GOTG V3